विजयपूर / वार्ताहर
विजापूर येथील मुकुंदनगर येथे सकाळी एका बालिकेचे अपहरण करण्याचा प्रयत्न झाल्याची खळबळजनक घटना घडली. सौंदर्या बिरादार या 8 वर्षांच्या बालिकेला एका अज्ञाताने पळून नेण्याचा प्रयत्न केला. ती रस्त्याने पायी जात असताना अज्ञात व्यक्तीने तिचे अपहरण करण्याचा प्रयत्न केला. यावेळी सौंदर्याने घाबरून आरडाओरडा केल्याने स्थानिक लोक जमा झाले. त्यांना पाहून अपहरणकर्त्याने पळ काढला. तो धावत जात असतानाचा व्हिडिओ सीसीटीव्हीमध्ये चित्रित झाला आहे. ही घटना गोलघुमट पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली.
0 Comments