26 रूपये किंमतीच्या गांजासह, 1 मोबाईल जप्त
सीसीबी पोलिसांची कारवाई
बेळगाव / प्रतिनिधी
बेळगाव शहर सीसीबी पोलिसांनी धाड घालून एका गांजा विक्रेत्याला अटक केली.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सीसीबीचे पोलीस निरीक्षक निंगनगौडा पाटील यांच्या नेतृत्वाखालील पथकाने एपीएमसी मार्केट यार्ड येथे बंदी घातलेल्या गांजाची विक्री करणाऱ्या खासबाग येथील आरोपी गणेश राजू टिटंबी याला अटक केली.
अटक करण्यात आलेल्या आरोपीकडून 26 हजार रुपये किमतीचा 1.3 किलो गांजा आणि 1 मोबाईल जप्त करण्यात आला आहे. या संदर्भात सीपीआय, सीसीबी यांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे सीईएन गुन्हे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. या विशेष मोहिमेत सहभागी झालेले पोलीस निरीक्षक
निंगनगौडा पाटील व कर्मचारी एच. एस. निसन्नावर, एस.बी.पाटील, एम.एम.वडियार, एस.एम.भजंत्री, वाय.डी.नदाफ यांच्या कार्याचे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी कौतुक केले आहे.
0 Comments