बेळगाव / प्रतिनिधी

हरियाणा येथे दि. 24 ते 27 ऑगस्ट दरम्यान होणाऱ्या फेडरेशन चषक-हरियाणा रोटक 2022 या 54 किलो वजनी गटात होणाऱ्या कुस्ती स्पर्धेत भाग घेतलेल्या हलगा बस्तवाड गावातील लक्ष्मी संजय पाटील हिच्या धाडस व शौर्याचे कौतुक करून बेळगाव ग्रामीण मतदार संघाच्या  आमदार लक्ष्मी  हेब्बाळकर यांनी तिला शुभेच्छा दिल्या. यावेळी आ. हेब्बाळकर यांनी ग्रामीण भागातील या मुलीने राज्य व राष्ट्रीय स्तरावर आपल्या खेळाची प्रेरणा दाखविल्याने तिची राष्ट्रीय स्तरावर निवड झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला. यावेळी लक्ष्मी पाटील हिचे कुटुंबीय व ग्रामस्थ उपस्थित होते.