• बेळगाव कॅम्प परिसरातील घटना 
  • कुटुंबीयांचा आक्रोश :नागरिकांतून संताप

बेळगाव / प्रतिनिधी

लोखंडाची वाहतूक करणाऱ्या ट्रकची धडक बसून झालेल्या अपघातात शाळकरी बालक जागीच ठार झाला. ही घटना आज सकाळी बेळगावच्या कॅम्प परिसरात घडली. कॅम्प परिसरात वाहनांची सतत वर्दळ असते. तसेच या भागात अनेक शाळा असल्यामुळे विद्यार्थ्यांची ही या मार्गावरून ये-जा सुरू असते. दरम्यान आज सकाळी लोखंडाची वाहतूक करणाऱ्या भरधाव ट्रकने शाळकरी मुलाला जोरदार धडक दिल्याने तो जागीच गतप्राण झाला. या घटनेनंतर कॅम्प परिसरातील नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.

अपघातानंतर नागरिकांनी या ट्रकला अडविले असून कारवाई होत नाही तोपर्यंत परिसरात ठाण मांडून बसण्याचा निर्धार केला आहे.घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी घटनास्थळी मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.अपघातानंतर बालकाच्या कुटुंबीयांनी केलेला आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता.


 .