• विजापूरच्या सिंदगी तालुक्यातील घटना 
  • अपघातानंतर कार चालक फरार

 (अपघातानंतर उलटलेली कार)

विजयपूर / प्रतिनिधी

भरधाव कारची समोरून येणाऱ्या दोन दुचाकींना जोराची धडक बसून झालेल्या अपघातात दोन्ही दुचाकी चालक गंभीर जखमी झाले. आज दुपारी चार वाजण्याच्या सुमारास विजयपूर जिल्ह्याच्या सिंदगी तालुक्यातील रंभापुर गावानजीक ही घटना घडली. राजू यड्रामी, बसवराज अंगरगी (दोघेही रा.रंभापुर,ता. सिंदगी, जि.विजयपूर) अशी अपघातात गंभीर जखमी झालेल्यांची नावे आहेत.

फोटो कॅप्शन : अपघातातील नुकसानग्रस्त दुचाकी 
 फोटो कॅप्शन : अपघातातील नुकसानग्रस्त दुचाकी 

याबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार KA-02, MK-1348 क्रमांकाची कार भरधाव वेगात रंभापुर हून सिंदगी कडे जात होती. याच दरम्यान दोन दुचाकीस्वार सिंदगी हुन रंभापुर च्या दिशेने येत होते. यावेळी चालकाचे नियंत्रण सुटल्याने कारची समोरून येणाऱ्या दोन्ही दुचाकीना धडक दिली. धडक बसताच कार उलटली. अपघातानंतर कार चालक फरार झाला आहे.

अपघाताची माहिती मिळताच सिंदगी पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. जखमींना अधिक उपचारासाठी सिंदगीच्या सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणाची सिंदगी पोलिसात नोंद करण्यात आली असून पोलिस फरार कार चालकाचा शोध घेत आहेत.