- मगरीचा बंदोबस्त करण्याची मागणी
- नागरिकांमध्ये घबराट
विजयपूर / प्रतिनिधी
विजयपूर जिल्ह्याच्या मुद्देबिहाळ तालुक्यातील नालतवाड येथे शेतवाडीतील विहीरी नजीक मगर आढळून आली. सदर शेत मानतेस यांच्या मालकीचे असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
आज सकाळी महांतेश आपल्या शेतामध्ये गेले असता, शेतातील विहिरीनजीक त्यांना मगरीचे दर्शन घडले. त्यानंतर त्यांनी आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात मगरीचे छायाचित्र टिपले. महांतेश यांनी याबाबत वनविभागाला माहिती दिली आहे.
शेतवाडीत मगरींचा वावर वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून या मगरींचा त्वरित बंदोबस्त करण्याची मागणी वनविभागाकडे करण्यात आली आहे.
0 Comments