विजयपूर / प्रतिनिधी
विजयपूर जिल्ह्यात दिवसेंदिवस पावसाचा जोर वाढत चालला असून अनेक ठिकाणी पाण्याचा प्रवाह वाढला आहे. विजयपूर मधील देवरहिप्परगी तालुक्यातील अलगूर या गावात असलेल्या नाल्याच्या पाण्यातून वाहून जाणाऱ्या दहा जणांना वाचविण्यात यश आले आहे. पावसाच्या पाण्यामुळे नाल्याच्या प्रवाहात वाढ झाल्याने या प्रवाहात माणसे आणि जनावरे वाहून जातानाचे चित्र दिसून आले. यावेळी दोरीच्या साह्याने दहा माणसे आणि काही जनावरांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले.
0 Comments