(कॅंटोन्मेंट परिसरातील एका शाळेच्या आवारात कोसळलेले झाड) 

बेळगाव / प्रतिनिधी 

बेळगाव कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीतील कॅम्प परिसरातील एका शाळेच्या आवारात अनेक दशकांपासून उभा असलेला मोठा वृक्ष उन्मळून पडला. शनिवारी ही घटना घडली.

गेली अनेक दशके कॅम्प परिसरातील एका शाळेच्या आवारात हे झाड उभे होते. मात्र हल्ली कमकुवत झाल्याने ते कोसळण्याच्या अवस्थेत होते. त्यामुळे येथील नागरिकांनी हे झाड तोडावे  अशी विनंती कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या मुख्य कार्यकारी अभियंत्यांना कडे अनेक वेळा केली होती. मात्र त्यांच्या विनंतीकडे दुर्लक्ष करण्यात आले.अखेर शनिवारी हे झाड कोसळले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. सर्व मुले सुखरूप शाळेतून घरी परतली.