बेळगाव / प्रतिनिधी 

गोल्फ कोर्स जंगल परिसरातील त्या 22 शाळांना शनिवार  दि. 13 ऑगस्ट रोजी देखील सुट्टी देण्याचा आदेश जिल्हा शिक्षणाधिकारी बसवराज नलतवाड यांनी बजावला आहे.

गोल्फ क्लब परिसरात बिबट्याचा वावर असल्याने गत आठवडाभरापासून वनविभागाची शोध मोहीम सुरू आहे. अजूनही बिबट्याला पकडण्यात यश आले नसल्याने धोका कायम आहे. नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना पोलिसांनी दिल्या आहेत. रात्रीच्या वेळी घराबाहेर पडू नये असेही सांगितले आहे.

या परिसरात शाळा व महाविद्यालयांची संख्या जास्त आहे. या पार्श्वभूमीवर "विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून हा निर्णय घेण्यात आल्याचे जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.