![]() |
(अपघाताचे थरारक दृश्य सीसीटीव्हीत कैद) |
दैव बलवत्तर म्हणून 'ते' वाचले
चुलत भावांनी अनुभवला मृत्यूचा थरार
अपघाताचे दृश्य सीसीटीव्हीत कैद
सांबरा / वार्ताहर
'काळ आला होता...पण वेळ आली नव्हती'... असे म्हटले जाते. याचाच प्रत्यय सख्ख्या चुलत भावंडांना आला आहे. भरधाव जाणाऱ्या बस खाली येऊन देखील केवळ दैव बलवत्तर म्हणून ते दोघे भाऊ अपघातातून थोडक्यात बचावले आहेत. यामुळेच देव तारी त्याला कोण मारी याचा प्रत्यक्ष अनुभव त्यांनी घेतला. केवळ दैवाची साथ म्हणून हे दोन भाऊ अक्षरशः मृत्युच्या दाढेतून बाहेर आले.
बसवण कुडची येथे झालेल्या अपघातात सुभाष कल्लाप्पा बेडका (वय 40) आणि सुधीर नागप्पा बेडका (वय 26) हे दोघे चुलत भाऊ सुदैवाने बचावले आहेत.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार बेळगावहून जमखंडी ला जाणाऱ्या सौंदत्ती आगाराच्या केएसआर टीसी परिवहनच्या बसने दुचाकीला मागून धडक दिली. यावेळी बस चालकाने शर्थीचे प्रयत्न करून बस नियंत्रणात आणली यामुळे त्या दोघांचेही प्राण वाचले. बेळगाव बागलकोट मार्गावर निलजी जवळ गुरुवारी दुपारी अडीच वाजता हा अपघात घडला. बसवन कुडचीहून सांबऱ्याकडे जाणारी दुचाकी निलजी येथे कुबेर धाब्याजवळ उजव्या बाजूला वळण घेत असताना बसची दुचाकीला मागून धडक बसली.
या घटनेत एक जण किरकोळ जखमी तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. या अपघाताचे थरारक दृश्य सीसीटीव्ही मध्ये कैद झाले आहे. जखमींना लागलीच उपचारासाठी बीम्स इस्पितळात दाखल करण्यात आले. या अपघाताची नोंद मारिहाळ पोलीस स्थानकात करण्यात आली आहे.
0 Comments