येळ्ळूर / वार्ताहर
येळ्ळूरची ग्रामदेवता चांगळेश्वरी देवीचा अभिषेक सोहळा मंगळवार दि. 09 ऑगस्ट रोजी उत्साहात पार पडला.
2001 साली श्री चांगळेश्वरी अभिषेक उत्सव मंडळ चांगळेश्वरी गल्ली येळ्ळूरची स्थापना करण्यात आली. आणि तेव्हापासून आतापर्यंत जवळजवळ 21 वर्षे हा अभिषेक सोहळा मोठया उत्साहाने करण्यात येत आहे.
कोरोनामुळे गेली 2 वर्षे अगदी साध्या पद्धतीने अभिषेक करण्यात आला होता. त्यामुळे यंदा मात्र श्री चांगळेश्वरी अभिषेक उत्सव मंडळाच्या वतीने श्री चांगळेश्वरी देवीचा अभिषेक सोहळा मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहात संपन्न झाला. त्यामुळे मंदिरात सकाळपासूनच भाविकांची गर्दी दिसून आली. सकाळपासून भजन, कीर्तन आणि विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. त्यानंतर देवीचा अभिषेक सोहळा संपन्न झाला.
यावेळी श्री चांगळेश्वरी अभिषेक उत्सव मंडळ, श्री चांगळेश्वरी युवक मंडळ, भजनी मंडळ येळ्ळूर, तसेच ग्रामस्थ उपस्थित होते. सर्व भक्तांनी प्रसादाचा लाभ घेतला.
0 Comments