बेळगाव / प्रतिनिधी
गुलबर्गा विद्यापीठांतर्गत येणाऱ्या बी. कॉम सेमिस्टर 3 साठी अविनाश ओगले यांच्या 'रंग मनाचे' या काव्यसंग्रहाची निवड करण्यात आली आहे. शैक्षणिक वर्षापासून हा संग्रह अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात आला.
एकंदर शंभर गुणांचा पेपर असून सर्व कवितांचा तुलनात्मक अभ्यास असणार आहे. तसेच मागील शैक्षणिक वर्षापासून राणी चन्नम्मा विद्यापीठा अंतर्गत बी. कॉम. पुढे आणि बी. बी. ए. सेमिस्टर 3 साठी अविनाश ओगले यांचा काजवा हा काव्यसंग्रह समाविष्ट केला आहे. तोही पेपर शंभर गुणांचा आहे. या संग्रहाचा तुलनात्मक अभ्यास सध्या विद्यार्थी करत आहेत. पूर्वीही राणी चन्नम्मा विद्यापीठात एम. ए. मराठीसाठी अविनाश ओगले यांचा हास्याक्षरे हा विडंबन कविता संग्रह अभ्यासक्रमात होता. एखाद्या विद्यापीठात बेळगाव मधील कवीचा काव्यसंग्रह अभ्यासक्रमात असणे ही अभिमानाची गोष्ट आहे.
शब्दगंध कविमंडळ, बेळगावचे संस्थापक कै.अविनाश ओगले त्यांच्या काही साहित्याचा विद्यापीठातील अभ्यासक्रमात समावेश केला जातो.ही बेळगाव साठी खूप अभिमानास्पद गोष्ट आहे. याही वर्षी त्यांच्या साहित्याची अभ्यासक्रमासाठी निवड झाली आहे.
0 Comments