कोसळलेल्या घराचीही केली पाहणी
नुकसान भरपाईसाठी प्रयत्न करणार असल्याचे दिले आश्वासन
बेळगाव/ प्रतिनिधी
मुसळधार पावसामुळे आज सकाळी भारत नगर क्रॉस नंबर 4 वडगाव येथे विणकर आनंद बिर्जे यांचे घर कोसळले. या घटनेत शेजारील पांडुरंग वाईंगडे यांच्या घराचे तसेच घरासमोर पार्क केलेल्या वाहनांचे मोठे नुकसान झाले होते. तसेच शांता वाईंगडे या किरकोळ जखमी झाल्या होत्या.
त्या नुकसानग्रस्त कुटुंबाची जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी भेट घेऊन विचारपूस केली. तसेच कोसळलेल्या घराची पाहणी करून शासनातर्फे नुकसान भरपाई मिळवून देण्याचा प्रयत्न करू असे आश्वासन दिले.
0 Comments