ऐतिहासिक विजयपूर शहरात कर्नाटक राज्य श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने पत्रकारांचे 37 वे संमेलन नोव्हेंबर महिन्यात आयोजित करण्यात आले असून, सर्वांनी एकजुटीने संमेलन यशस्वी करण्यासाठी सहकार्य करावे असे कर्नाटक राज्य श्रमिक पत्रकार संघाचे राज्यअध्यक्ष शिवानंद तगडूर यांनी सांगितले.
शहरातील पत्रकार भवनात आयोजित संमेलनाच्या पूर्वतयारी सभेत बोलताना ते पुढे म्हणाले, मागील माझ्या अध्यक्षपदाच्या तीन वर्षाच्या कालावधीत म्हैसूर जवळील संतुर, मंगळूर व कलबुर्गी येथे यशस्वीरित्या संपन्न झाली आहे. या सर्व संमेलनात अपेक्षेपेक्षा जास्त मोठ्या संख्येने पत्रकार सहभागी झाले होते, विजयपूर येथील संमेलनही शिस्तबद्ध रित्या, एक आदर्श निर्माण होईल असा संदेश राज्यात पोहचावे. ज्ञानयोग आश्रमाचे श्री सिद्धेश्वर स्वामींच्या सनिध्या मध्ये सर्वपक्षीय जनप्रतिनिधी सह स्वागत समितीची रचना करून जिल्हा प्रशासनाचे सहकार्य घेऊन व सर्व आजी माजी पदाधिकारी यांच्या सहकार्याने संमेलन यशस्वी करावे असे सांगितले.
0 Comments