दुबई : येथे खेळल्या जात असलेल्या आयसीसी एकदिवसीय चॅम्पियनशिप स्पर्धेच्या आजच्या अंतिम सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडने सात गाडी गमावून २५१ धावा केल्या. भारताला आता चॅम्पियनशिप करंडक पटकावण्यासाठी २५२ धावांचे उद्दिष्ट पार करावयाचे आहे.
न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना झटपट विकेट गमावले पण डॅरिल मिचेल आणि ब्रेसवेलच्या अर्धशतकाने किवी संघाने झुंज देण्याइतकी मोठी धावसंख्या उभारली आहे. आता भारतीय संघ कशी फलंदाजी करणार यावर सर्वांच्या नजरा असणार आहेत.
भारताच्या फिरकीपटूंनी उत्कृष्ट गोलंदाजी करत किवी संघाच्या फलंदाजांना धावा काढू दिल्या नाहीत. मधल्या षटकांमध्ये वरूण चक्रवर्ती, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा आणि अक्षर पटेल यांनी कमालीची गोलंदाजी केली. तर न्यूझीलंडकडून डॅरिल मिचेलने ६३ धावांची, ग्लेन फिलिप्सने ३४, रचिनने ३७ तर ब्रेसवेलने ५३ धावांची वादळी फलंदाजी केली. ब्रेसवेलने संघाला चांगल्या धावसंख्येपर्यंत नेण्यात मोठी मदत केली.
0 Comments