बेळगाव / प्रतिनिधी
शनिवार दि. ८ रोजी संध्याकाळी येळ्ळूर येथील शेतकरी अनंत मुचंडी यांच्या शिवारातील बासमती भाताच्या गंजीला आग लागून नुकसान झाले आहे. गवताच्या गंजीने अचानक पेट घेतल्याने सुमारे वीस हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. या भागात काही अज्ञात युवकांचा संचार वाढला आहे. त्यांच्याकडून दारूच्या बाटल्या आणि सिगारेटची थोटके शेतामध्ये फेकण्याचे प्रकारही घडत आहेत. यामुळे शेतकऱ्यांना फटका बसत आहे.

या संबधीत पोलीस खात्याने शिवारात जूगार, पार्ट्या,दारु,गांजा सेवन करणाऱ्यावर करडी नजर ठेऊन शेतकऱ्यांच्या चाऱ्याचे,पीकांचे व इतर नुकसान थांबवावे अशी मागणी समस्त शेतकरी बंधूतर्फे होत आहे.