येळ्ळूर :  क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या फोटोचे पूजन करताना
सौ. रुपा अरविंदराव पाटील, सौ. रूपा होसुरकर,
सौ. शोभना नंद्याळकर, सौ. नेहा पाटील,श्रीमती यमुना यादव,
सौ. सुनिता जाधव, सौ. सुजाता वंडेकर ,श्रीमती. रेखा कंग्राळकर,
मुख्याध्यापक श्री. टी.वाय.भोगण यांच्यासह मान्यवर.

बेळगाव : येळ्ळूर - दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संचलित नेताजी हायस्कूल सुळगे (ये.) येथील सभागृहात जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या फोटोचे पूजन कार्यक्रमाच्या अध्यक्षा सौ. रूपा अरविंदराव पाटील व सौ. रूपा राजशेखर होसुरकर (कामती) यांच्या शुभहस्ते व सौ. शोभना रामचंद्र नंद्याळकर, सौ. नेहा अक्षय पाटील, श्रीमती यमुना धोंडीराम यादव, सौ. सुनिता जाधव मॅडम व विद्यार्थिनी प्रतिनिधी कुमारी सृष्टी प्रभाकर बेळवटकर यांच्या शुभहस्ते दीप प्रज्वलन झाले. 

कार्यक्रमाची सुरुवात इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांनीच्या स्वागत गीताने होऊन उपस्थित मान्यवरांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. त्यानंतर समाज विज्ञान विषयतज्ञ श्री. एम. पी. कंग्राळकर सर यांनी आपल्या भाषणातून मासाहेब जिजाऊ,कल्पना चावला, मदर तेरेसा, सावित्रीबाई फुले, झाशीची राणी लक्ष्मीबाई, कित्तूर राणी चन्नम्मा यांच्यासारख्या कर्तुत्वान महिलांना आदराने स्मरण करूया कारण त्यांनी आपल्या कार्यांनी समाजात मोलाचे योगदान दिले आहे आज प्रत्येक क्षेत्रात महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहेत.महिला म्हणजे केवळ शक्ती नाही तर ती करुणा आणि प्रेमाचा झरा आहे.असे उदगार काढले.

यानंतर कार्यक्रमाच्या प्रमुख वक्त्या सौ. रुपा राजशेखर होसुरकर मॅडम यांनी आपल्या भाषणातून लैंगिक विषमता आणि भेदभावाबद्दल जागरूकता वाढवताना महिलांच्या कर्तुत्वाचा सन्मान करण्यासाठीचा आणि तो साजरा करण्यासाठीचा हा जागतिक दिवस आहे असे मत मांडले. 

त्यानंतर आदरणीय मुख्याध्यापक श्री. टी. वाय. भोगण सर यांनी आपल्या अध्यक्षीय समारोपातून महिला सक्षमीकरण, त्यांची सुरक्षितता सुनिश्चित करणे आणि सर्व प्रकारच्या भेदभावाचे उच्चाटन करण्याचे महत्त्व पटवून दिले.स

दर कार्यक्रमाला नेताजी हायस्कूलचे सर्व शिक्षक,शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी,विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती. रेखा कंग्राळकर मॅडम यांनी तर आभार प्रदर्शन सौ. सुजाता वंडेकर मॅडम यांनी केले.