- देश - विदेशातील हजारो स्पर्धकांचा उत्स्फूर्तपणे सहभाग
बेळगाव / प्रतिनिधी
बेळगाव शहर पोलिसांच्या वतीने ड्रग्जमुक्त (नशामुक्त) कर्नाटक आणि शांततामय वातावरण निर्माण करण्यासाठी "रन फॉर पीसचे" आयोजन करण्यात आले होते. यामध्ये देश - विदेशातील हजारो स्पर्धकांनी सहभाग घेऊन नशामुक्त कर्नाटकच्या उभारणीचा संकल्प केला.
बेळगाव शहर पोलिसांच्यावतीने आज बेळगावात रन फॉर पीसचे आयोजन करण्यात आले होते. शहरातील सीपीएड यावेळी शहर पोलीस आयुक्त ईडा मार्टिन, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. भीमाशंकर गुळेद, आयजीपी चेतनसिंग राठोड, अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक श्रुती, डॉ. सोनवलकर यांच्यासह अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत मॅरेथॉनला चालना देण्यात आली. ही स्पर्धा ५ किमी आणि १० किमी अशा दोन प्रकारात पार पडली.
या मॅरेथॉनमध्ये आयजीपी चेतनसिंग राठोड यांनी १० किमी धावून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. या स्पर्धेला देशभरातून आलेल्या स्पर्धकांचा चांगला प्रतिसाद होता. यावेळी बोलताना आयजीपी चेतनसिंग राठोड म्हणाले, बेळगाव शहर पोलिसांच्या वतीने लोकसेवा, शांततापूर्ण वातावरण आणि निरोगी जीवनाचा संदेश देण्यासाठी रन फॉर पीसचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी शहर पोलीस आयुक्त ईडा मार्टिन यांनीही 'रन फॉर पीस'चा उद्देश सांगितला आणि त्यांना शुभेच्छा दिल्या.कर्नाटकला अंमली पदार्थमुक्त करण्यासाठी राज्याचे पोलीस विभाग कटिबद्ध आहे. यासाठी जनतेनेही सहकार्य करावे. प्रत्येकासाठी फिटनेसचा कानमंत्र पोलीस अधीक्षक डॉ. भीमशंकर गुळेद यांनी दिला.
महाराष्ट्रातील सांगली येथून रन फॉर पीसमध्ये सहभागी झालेल्या अनिकेत शिनगारे या तरुणाला प्रथम पारितोषिक मिळाले असून, प्रथमच बेळगावात येऊन चांगली कामगिरी केल्याबद्दल त्याचे कौतुक करण्यात आले. विशेष म्हणजे या रन फॉर पीसमध्ये बेळगावसह कर्नाटक, महाराष्ट्र आणि गोव्यातीलच नव्हे, तर ऑस्ट्रेलियातील स्पर्धक सहभागी झाले होते. 'रन फॉर पीस'मध्ये परदेशी लोकांनीही उत्साहाने भाग घेतला आणि ड्रग्जमुक्त कर्नाटक निर्माण करण्यासाठी घेतलेल्या पुढाकाराची प्रशंसा केली. यावेळी विजेत्यांना आकर्षक बक्षिसांचे वितरण करण्यात आले.
0 Comments