बेळगाव / प्रतिनिधी
बेळगाव शहरातील जुने बेळगाव येथील तलावात पडून वृद्धेचा मृत्यू झाला. शनिवारी सायंकाळी ही घटना उघडकीस आली. मल्लव्वा बाबुराव सालगुडे (वय ७५ रा. कलमेश्वरनगर, जुने बेळगाव) असे त्या वृद्ध महिलेचे नाव आहे. त्यांच्या पश्चात दोन मुलगे,विवाहित मुलगी सूना ,नातवंडे असा परिवार आहे.
शनिवार दि. ८ मार्चच्या सकाळी ११ ते सायंकाळी ५ यावेळेत जुने बेळगाव येथील कलमेश्वर तलावात बुडून तिचा मृत्यू झाला असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.शनिवारी रात्री शहापूर पोलीस स्थानकात घटनेची नोंद झाली आहे. या प्रकरणी शहापूरचे पोलीस निरीक्षक सिद्धाप्पा सिमानी पुढील तपास करीत आहेत.
0 Comments