येळ्ळूर , ता. ८: येळ्ळूर गावचे सुपुत्र, आशादीप वेल्फेअर सोसायटीचे अध्यक्ष व अभियंते हणमंत कुगजी व त्यांच्या पत्नी उज्वला कुगजी यांच्याकडून खानापूर दुर्गम भागातील असोगा, नेरसा, चाफा वाडा, हणबरवाडा व कोंगळा (नदीतून वाट काढून) येथील २०० हून अधिक विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी बोलताना अभियंते हणमंत कुगजी म्हणाले, शिक्षित समाज व विद्यार्थी हेच भावी व सुंदर भारताचे भविष्य समजून व त्यांच्यामध्ये आदरभाव, प्रेमभाव, नम्रपणा व धार्मिकता या संपूर्ण गोष्टीचा प्रभाव पडावा याचसाठी आशादीप तर्फे गेल्या दहा वर्षापासून शैक्षणिक साहित्याचे वाटप व गरीब महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आर्थिक मदत करण्याची परंपरा कायम ठेवण्यात आली आहे.
आशादीप ही संस्था विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी काम करणारी संस्था म्हणून परिचित आहे माजी तालुका पंचायत सदस्य अशोक देसाई यावेळी बोलताना म्हणाले, केवळ शैक्षणिक साहित्य वाटप करणे एवढेच या संस्थेचे कार्य नाही तर या संस्थेचे काम सर्वस्वी आगळे वेगळे आहे. मुलांच्या अंगी अभ्यासाव्यतिरिक्त अनेक गुण सुप्ताअवस्थेत असतात त्या गुणांचा शोध घेऊन ते विकसित करण्याचे काम ही संस्था खानापूर तालुक्यातील दुर्गम भागात, त्याचबरोबर बेळगाव तालुक्यात सुद्धा करत आहे असे गौरवउदगार काढले. या कार्यक्रमाच्या वेळी आशादीप वेल्फेअर सोसायटीचे अध्यक्ष अभियंते हणमंत कुगजी व त्यांच्या पत्नी उज्वला कुगजी त्याचबरोबर नेरसा येथील तालुका पंचायत सदस्य अशोक देसाई, नेरसा ग्रामपंचायत अध्यक्षा अश्विनी देसाई, शाळेतील मुख्याध्यापक, व शिक्षक वृंद उपस्थित होते.या साहित्य वाटपाच्या कार्यक्रमाप्रसंगी प्रत्येक शाळेतील मुख्याध्यापकांना डॉ. शरद बाविस्कर यांच्या भुरा कादंबरीच्या १५ पुस्तकांचे वाटप देखील करण्यात आले.
0 Comments