बेळगाव / प्रतिनिधी
बेळगाव शहरातील गणाचारी गल्लीत कम्युनिटी हॉल बांधण्याच्या नगरसेवक शंकर पाटील यांनी मांडलेल्या प्रस्तावाला विरोध करून खाटीक समाजासह बकरी मंडईतील नागरिकांनी आज जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले.
बेळगावच्या गणचारी गल्लीत १०० वर्ष जुनी खाटीक समाजाची बकरी मंडई आहे. बकरी मंडईच्या विकासासाठी अनेक आमदार व नगरसेवकांनी योगदान दिले आहे. मात्र नगरसेवक शंकर पाटील बकरी यांनी मंडईतील जागा ताब्यात घेऊन कम्युनिटी हॉल बांधण्याचा मांडलेला प्रस्ताव समाजातील लोकांना त्रासदायक ठरणारा आहे.
बेळगावातील गणचारी गल्ली हे हिंदू खटीक समाजाशी निगडीत ठिकाण आहे. महापालिकेच्या स्थापनेनंतर सिटी सर्व्हे झाल्यावर या ठिकाणाची बकरी मंडई म्हणून नोंदणी करण्यात आली. जरी ही जागा महापालिकेच्या मालकीची असली तरी समाजातील सर्व लोक तेथे व्यवसाय करतात. त्या जागेवर कम्युनिटी हॉल बांधू नये, अशी मागणी रहिवासी सुधीर घोडके यांनी केली.
यावेळी गणाचारी गल्लीतील रहिवासी व खाटीक समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments