शहरातील कंदगल हनमंतराय रंगमंदिरात आयोजित विजयपूर जिल्हा कार्यरत पत्रकार संघाच्या वार्षिक सर्वसाधारण सभा व साधकांच्या सत्कार समारंभात ज्येष्ठ पत्रकार व संघाचे सहखजिनदार दिपक शिंत्रे यांचा सत्कार करण्यात आला.
याचप्रसंगी माध्यम अकादमी पुरस्कार प्राप्त सुशीलेंद्र नायक, महेश शटगार, केयूडीब्ल्यूजे पुरस्कार प्राप्त शशिकांत मेंडेगार, अल्लमप्रभू मल्लिकार्जुनमठ, राणी चन्नम्मा विश्वविद्यालयाचे सिंडिकेट सदस्य म्हणून नियुक्त केले गेलेले रफी भंडारी, कार्यरत संपादक संघाचे नवीन जिल्हा अध्यक्ष इर्फान शेख यांना अभिनंदन पत्र देऊन सत्कार करण्यात आला. समारंभानंतर संघाच्या सर्व सदस्यांची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न झाली. विजयपूर शहरासह जिल्ह्यातील सर्व तालुका घटक पदाधिकारी आणि सदस्य सभेत उपस्थित होते.
0 Comments