बेळगाव : प्रेम प्रकरणातून प्रेयसीचा चाकूने गळा चिरून खून केल्यानंतर प्रियकरानेही आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना काल मंगळवारी संध्याकाळी शहापूर नाथ पै सर्कल जवळ घडली होती.या प्रेम प्रकरणात ऐश्वर्या लोहार (रा.नवी गल्ली) आणि प्रशांत कुंडेकर (रा.येळ्ळूर) या दोघांना आपले प्राण गमवावे लागले. या घटनेमुळे शहापूर परिसरात एकच खळबळ उडाली.
त्याचबरोबर घडकलेल्या प्रकाराबद्दल नागरिकांमधून हळहळ ही व्यक्त करण्यात येत होती. दरम्यान आज बुधवारी दुपारी दोघांचेही मृतदेह संबंधित कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आले. मयत ऐश्वर्या लोहार मुतदेहावर शहापूर स्मशानभूमीत तर प्रशांत कुंडेकर याच्या मृतदेहावर येळ्ळूर स्मशानभूमी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार पार पडले.