- खडेबाजार पोलिसांची कारवाई
- एकूण १० लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत
बेळगाव / प्रतिनिधी
गुडशेड रोड येथे अवैधरित्या साठवून ठेवलेली सात लाख रुपये किंमतीची गोव्यातून आणलेली दारू जप्त करून पोलिसांनी आरोपीला अटक केली. राकेश चौगुले असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
होळी आणि रंगपंचमीसाठी गोव्यातून दारू आणून बेळगावात विकली जात असल्याची माहिती मिळताच खडेबाजार पोलिसांनी विशेष पथक तयार करून छापा टाकला. या कारवाईत सुमारे ७ लाख ३० हजार किमतीची दारू, तीन लाखाचे बुलेरो पिकअप वाहन असा एकूण १० लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
शहर पोलीस आयुक्त ईडा मार्टिन, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. भीमाशंकर गुळेद यांच्या मार्गदर्शनाखाली डीसीपी रोहन जगदीश, एसीपी एच. शेखरप्पा, खडेबाजार पोलीस स्थानकाचे निरीक्षक श्रीशैल गाभी यांच्या नेतृत्त्वात पीएसआय आनंद आडगोंड, कर्मचारी ए.बी.शेट्टी, बी.एस.रुद्रापुर, बी. एल. सरवी, भरमान्ना करगार, संतोष बरगर, सदाशिव कट्टीमनी, चन्नाप्पा थेली, ए.एस.हेगन्ना आदींनी या कारवाईत सहभाग घेतला होता.
0 Comments