बेळगाव / प्रतिनिधी
गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या कर्नाटक - महाराष्ट्र सीमा प्रश्नावर सीमाभागात महाराष्ट्र शासनाकडून समन्वय साधण्यासाठी चंद्रकांतदादा पाटील आणि शंभूराजे देसाई या दोन मंत्र्यांची समन्वयक मंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. शुक्रवारी महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने या दोन्ही मंत्र्यांच्या नियुक्तीचा आदेश जारी केला आहे.
महाराष्ट्र - कर्नाटक सीमाप्रश्नासंदर्भात महाराष्ट्र शासनाने सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेचा प्रभावीपणे पाठपुरावा करण्यासाठी, याचिकेवर सरकारचे प्रतिनिधित्त्व करण्यासाठी नियुक्त केलेले जेष्ठ वकील आणि महाराष्ट्र एकीकरण समिती यांच्यात समन्वय साधण्यासाठी भाजपकडून मंत्री चंद्रकांत दादा पाटील आणि शिवसेनेकडून शंभूराज देसाई या दोन मंत्र्यांकडे ही जबाबदारी देण्यात आली आहे. राज्यसरकारने २०१५ पासून सीमाप्रश्नासाठी समन्वय मंत्र्यांची नियुक्ती केली होती. मागील मुख्यमंत्री शिंदे सरकारच्या कार्यकाळात देखील शंभूराज देसाई आणि चंद्रकांत दादा पाटील त्यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली होती तर चंद्रकांत दादा पाटील यांनी २०१४ ते २०१८ या दरम्यान पाच वर्ष सीमा समान आहेत म्हणून काम केले होते.
0 Comments