- उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाशी लढत
दुबई : टीम इंडियाने आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेतील साखळी फेरीत विजयी हॅट्रिक पूर्ण केली आहे. टीम इंडियाने या स्पर्धेमधील साखळी फेरीतील शेवटच्या सामन्यात न्यूझीलंडवर 44 धावांनी विजय मिळवला आहे. टीम इंडियाने न्यूझीलंडला विजयासाठी 250 धावांचे आव्हान दिले होते. मात्र टीम इंडियाच्या गोलंदाजांनी चिवट बॉलिंग करत न्यूझीलंडला 45.3 ओव्हरमध्ये 205 धावांवर गुंडाळले आणि विजय मिळवला. आता 4 मार्च रोजी दुबई येथे होणाऱ्या उपांत्य फेरीत भारताचा सामना ऑस्ट्रेलियाशी होईल. ऑस्ट्रेलियन संघ ग्रुप 'बी' मध्ये दुसऱ्या स्थानवर आहे.
0 Comments