• जिल्हा पोलिस प्रमुख लक्ष्मण निंबरगी यांचे आवाहन 

विजयपूर / प्रतिनिधी 

कर्नाटक पोलीस रन 2025 "ड्रग फ्री कर्नाटक" "सर्वांसाठी फिटनेस" आणि "आमचे पोलीस आमचा अभिमान" या थीम अंतर्गत  दि. 9 मार्च रविवार रोजी मॅरेथॉन रन (5 किमी)  स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हा पोलिस प्रमुख लक्ष्मण निंबरगी यांनी केले आहे.  सकाळी ६ . ३० वाजता गोलगुंबज येथून सुरू होऊन जिल्हा स्टेडियम, बसवेश्वर सर्कल, गांधी चौक, शिवाजी सर्कल, पाण्याची टाकी, सोलापुर रोड येथे जाऊन जिल्हा पोलीस परेड ग्राऊंड येथे समाप्त होणार आहे.  

मॅरेथॉनमध्ये सहभागी होणाऱ्या विविध श्रेणीतील प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक विजेत्यांना प्रमाणपत्रे व पदकांचे वितरण करण्यात येणार आहे.

मॅरेथॉनमध्ये सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांनी विजयपूर डिऐआर युनिटच्या श्रीरंगप्पा आरएसआय (मो: 9901145001), मल्लनगौडा आरएसआय (मो: 9880299439) आणि दानेश कल्याणी आरएसआय (मो: 8050481012) या क्रमांकावर दिनांक 8 मार्च पर्यंत आपली नावे नोंदवावी , सहभागी स्पर्धकांना टी - शर्ट आणि कॅपचे वाटप केले जाईल.

कर्नाटक पोलीस रन-2025 कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जनतेने मोठ्या संख्येने सहभाग घ्यावा अशी विनंती जिल्हा पोलिस प्रमुख लक्ष्मण निंबरगी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे.