सुळगा (उ.) / वार्ताहर 

बेळगाव ग्रामीण मतदारसंघातील सुळगा (उ.) गावात मंगळवारी युवक काँग्रेस नेते मृणाल हेब्बाळकर आणि स्थानिक लोकप्रतिनिधींच्या हस्ते शेतकरी समाज भवन इमारतीच्या बांधकामाचे भूमिपूजन करून शुभारंभ करण्यात आला.

याप्रसंगी बोलताना युवक काँग्रेस नेते मृणाल हेब्बाळकर म्हणाले, ग्रामस्थांच्या मागणीनुसार येथे शेतकरी समाज भवनची इमारत बांधण्यात येत आहे. यासाठी राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आणि बेळगाव ग्रामीण मतदार संघाच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या विशेष प्रयत्नातून अनुदान मंजूर झाले असल्याचे त्यांनी सांगितले. 

यावेळी युवराज कदम, युवक काँग्रेस नेते मृणाल हेब्बाळकर, ग्रा. पं. सदस्य यल्लाप्पा कलखांबकर, मारुती पाटील, महादेव कंग्राळकर, परशराम तोरे, निर्मला कलखांबकर, राजश्री कोलकार, सरिता तुप्पट, वैष्णवी खटावकर, पीडीओ वीणा हलवाई, वर्षा सांगावकर, लक्ष्मण गुंडू पाटील, काशीराम ओ. पाटील, देवस्की पंच कमिटीचे अध्यक्ष भावकू भैरू पाटील, अनिल लक्ष्मण पाटील, अजित कलखांबकर, उमेश पाटील यांच्यासह इतर उपस्थित होते.