• प्रभारी तहसीलदार म्हणून रवींद्र हाडिमनी यांची नियुक्ती

खानापूर / प्रतिनिधी 

खानापूरच्या तहसीलदारपदी रवींद्र हाडिमनी (ग्रेड - १ तहसीलदार, कित्तूर) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. लोकायुक्त धाडीनंतर खानापूरचे तहसीलदार प्रकाश गायकवाड यांच्यावर क्रिमिनल खटला (१ /२०२५) असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर सरकारने पुढील आदेश येईपर्यंत त्यांना निलंबित करण्याचा निर्णय घेतला असून पुढील आदेश येईपर्यंत रवींद्र हाडिमनी प्रभारी तहसीलदार म्हणून कार्यभार संभाळणार आहेत.या निर्णयामुळे प्रशासनात मोठा बदल झाला असून नागरिकांमध्ये चर्चेला उधाण आले आहे.

सरकारच्या आदेशानुसार जिल्हाधिकाऱ्यांना  प्रकाश गायकवाड यांना विद्यमान पदावरून मुक्त करून धारवाड जिल्हाधिकारी कार्यालयातील रिक्त पदावर बदलीसाठी हजर होण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तर गायकवाड यांना न्यायनिवाडा होईपर्यंत जिल्हा न सोडण्याचा आदेश बजावण्यता आला आहे.