• गोकाक तालुक्यातील घटना 

गोकाक / वार्ताहर 

वीज बिलाची थकबाकी वसूल करण्यास गेलेल्या लाईनमनला जबर मारहाण झाल्याची घटना गोकाक तालुक्यातील दुपधाळ गावात घडली.

दुपधाळ येथील खादीरसाब पठाणसाब कोतवाल यांनी अंदाजे रू. १७,१४६ /-  इतके वीज बिल थकवले होते. सुमारे सात महिन्यांपूर्वी स्थानिक लाईनमनने त्यांना बिल भरायला सांगितले होते, परंतु त्यांनी दुर्लक्ष केल्याने वीज पुरवठा खंडीत करून वायर कापण्यात आली होती.

तरीसुद्धा खादीरसाब पठाणसाब कोतवाल यांनी अनधिकृतरीत्या वीज जोडणी घेतल्याचे लक्षात आल्यानंतर, वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार लाईनमन प्रमोद माळगी आणि त्यांचे सहकारी कापलेली वायर हटवण्यासाठी गेले असता, खादीरसाब पठाणसाब कोतवाल याने प्रमोद माळगी यांच्यावर हल्ला करून त्यांना जोरात मारहाण केली आणि उचलून जमिनीवर आपटले.  

 थकबाकी वसुली करण्यासाठी गेलेल्या सर्वांवर असाच हल्ला झाला तर त्याला जबाबदार कोण आणि हल्ला करणाऱ्यांवर हेस्कॉमचे अधिकारी काय कारवाई करणार, असा सवाल हेस्कॉमच्या कर्मचाऱ्यांनी या घटनेनंतर उपस्थित केला आहे.