मुंबई : येथे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे व मंगेश चिवटे यांची भेट घेऊन सीमाभागातील मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी संबंधित चर्चा करण्यात आली. या भेटीदरम्यान चिवटे यांनी येणाऱ्या दिवसात लवकरात लवकर उपमुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाला सुरुवात होईल व महात्मा ज्योतिबा फुले अंतर्गत मदत सुद्धा चालू करण्यासाठी वाटचाल चालू आहे अशी माहिती दिली.
त्यानंतर उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांच्या वाढदिवसानिमित्त या विशेष उपमुख्यमंत्री वैद्यकीय कक्षाची अधिकृत घोषणा करण्यात आली आणि त्याचबरोबर मंगेश चिवटे यांना त्या कक्षाचे राज्य प्रमुख म्हणून सुद्धा अधिकृत घोषणा करण्यात आली.
थोड्याच दिवसात सीमाभागातील ८६५ गावांना सुद्धा उपमुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी व महात्मा ज्योतिबा फुले अंतर्गत योजनांचा लाभ मिळण्यास सुरुवात होणार आहे. त्याकरिता पुन्हा एकदा मुंबईला येऊन त्याची सविस्तर कागदोपत्री माहिती घेण्यास सांगितले आणि ती माहिती आम्ही प्रसार माध्यमातून येणाऱ्या दिवसात प्रसिद्ध करू.
या भेटीदरम्यान सीमा भागातील महाराष्ट्र एकीकरण समितीचे वैद्यकीय समन्वयक प्राचार्य आनंद आपटेकर, मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे जनसंपर्क प्रमुख विकास कलघटगी राजेश, लोहार उपस्थित होते.
0 Comments