बेळगाव येथील कुमार गंधर्व कला मंदिराजवळ शनिवार दि. १५ फेब्रुवारी रोजी सायंकाळी सेवालाल जयंती दरम्यान जेवणाच्या ताटाला हात लावण्याच्या क्षुल्लक कारणावरून तरुणांच्या टोळक्याने एका व्यक्तीवर हल्ला करून त्याला अमानुष मारहाण केली. बेळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर ही घटना घडली.
यावेळी ड्युटी संपवून आपल्या मुलीला ज्यूस देण्यासाठी गेलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी हा प्रकार पाहिला आणि हल्ला रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांच्यावरही त्या टोळक्याने हल्ला केला. त्यानंतर पोलीसांची ११२ क्रमांकाची पेट्रोलिंग कार आल्यानंतर तरुण तेथून निघून गेले.
0 Comments