- जिल्ह्यात आतापर्यंत चौघांचा मृत्यू
रायबाग / वार्ताहर
फायनान्स कंपन्यांकडून थकीत कर्ज वसुलीसाठी जनतेचा छळ सुरूच आहे. एकाच महिन्यात चारजण छळाचे बळी ठरले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतरही बेळगाव जिल्ह्यात छळ होण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
बेळगाव जिल्ह्याच्या रायबाग शहरातील बसवराज हट्टी यांनी फायनान्सच्या छळाला कंठाळून आत्महत्या केली आहे. बसवराज यांनी विविध फायनान्स कंपन्यांकडून २ लाख ५० हजार रुपयांचे कर्ज घेतले होते. मात्र कर्ज भरण्यास विलंब होत असल्याने, मायक्रोफायनान्स कर्मचाऱ्यांनी गेल्या महिनाभरापासून कर्जाचे थकीत असलेले हप्ते वसूल करण्यासाठी त्रास देण्यास सुरुवात केली. त्या त्रासाला कंटाळून यापासून दि. ११ फेब्रुवारी रोजी विषप्राशन करून त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला. यानंतर त्यांना लगेचच बेळगाव बीम्स रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान शनिवारी रात्री बसवराज यांचा मृत्यू झाला. बसवराज यांच्या मृत्यूसाठी मायक्रोफायनान्सचा छळ कारणीभूत असल्याचा आरोप त्यांच्या पत्नीने केला आहे.
यापूर्वी बैलहोंगल येथील रफीक तिगडी आणि रायबाग तालुक्यातील शेतकरी शिवनाप्पा धर्मट्टी यांनी आत्महत्या केली होती. आता रायबाग शहरात बसवराज यांनी पुन्हा आत्महत्या केली. वर्ष संपत आल्याने कर्जवसुलीच्या नावाखाली मायक्रोफायनान्सचे कर्मचारी गुंडगिरी करत आहेत. यामुळे कर्ज फेडता येत नाही आणि बदनामी सहन होत नसल्याने ते आत्महत्या करत आहेत. जिल्हा प्रशासन आणि पोलीस विभागाने कितीही इशारे दिले तरी बेळगाव जिल्ह्यात फायनान्सचा छळ थांबत नाही. फौजदारी गुन्हा दाखल करण्याचा इशारा दिल्या तरीही मायक्रोफायनान्सचे कर्मचारी बेधडक आहेत. त्याचाच परिणाम म्हणून एकट्या बेळगाव जिल्ह्यात दिवसेंदिवस छेडछाडीच्या घटना उघडकीस येत आहेत.
एकंदरीत, सरकारच्या कडक इशाऱ्यानंतरही, मायक्रोफायनान्सचा घोळ सुरूच आहे. त्रास देणाऱ्या फायनान्सर्सवर सरकारने कडक कारवाई करावी अशी मागणी होत आहे.
0 Comments