बेळगाव / प्रतिनिधी
बेळगाव तालुक्यातील भुतरामहट्टीजवळील कित्तूर राणी चन्नम्मा प्राणीसंग्रहालयातील एका सिंहिणीचा वयाशी संबंधित आजार आणि अनेक अवयव निकामी झाल्याने मृत्यू झाला आहे.
१५ वर्षीय निरुपमा यांच्यावर वन्यजीव डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार गेल्या १५ दिवसांपासून उपचार सुरू होते. मात्र, काल दुपारी १२.५५ वाजता उपचार निष्फळ ठरल्याने प्राणिसंग्रहालयात तिचा मृत्यू झाला. वन्यजीव डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार शवविच्छेदन केल्यानंतर निरुपमावर प्राणिसंग्रहालयाच्या आवारात सन्मानाने अंत्यसंस्कार करण्यात आले.
डीएफओ मारिया क्रिस्टो राजा, विभागीय वन अधिकारी पवन कुरणिंग, वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. हनुमंत सन्नक्की, तज्ज्ञ डॉक्टर डॉ. श्रीकांत कोहल्ली, प्राणिसंग्रहालयाचे डॉक्टर डॉ. नागेश हुइलगोळ व इतर कर्मचारी उपस्थित होते.
0 Comments