बेळगाव : मध्यवर्ती बस स्थानकात दागिने चोरणाऱ्या तीन महिलांच्या टोळीला मार्केट पोलिसांनी जेरबंद केले असून त्यांच्याजवळील 8 लाख 90 हजार किंमतीचे 97 ग्रॅम 650 मिली वजनाचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. 

दीपा किरण सगटा (वय 28) , सपना विकास जाधव (वय 35), प्रेरणा सगटा (वय 22) तिघीही राहणार बुद्धनगर निपाणी अशी या चोरट्या महिलांची नावे आहेत. 3 फेब्रुवारी रोजी महाद्वार रोड बेळगाव येथील महिलेचे दागिने बेळगाव बस स्थानकावर चोरीला गेले होते तिने दिलेल्या फिर्यादीवरून तपास करताना पोलिसांनी या तीन महिलांना पकडले आहे.