बेळगाव / प्रतिनिधी  

ओढणीने गळा आवळून पतीचा खून करणाऱ्या महिलेची हिंडलगा मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. शनिवार दि. ८ फेब्रुवारी रोजी सकाळी रामतीर्थ नगर परिसरात खुनाचा हा प्रकार उघडकीस आला होता.

आशा अमित रायबाग (वय २९), रा. रामतीर्थनगर असे त्या महिलेचे नाव आहे. माळमारुती पोलीस निरीक्षक जे. एम. कालीमिर्ची व त्यांच्या सहकाऱ्यांनी शनिवारी दुपारी तिला ताब्यात घेतले होते. फटकेची प्रक्रिया पूर्ण करून आशाला न्यायाधीशांसमोर हजर करण्यात आले.

न्यायालयाच्या आदेशावरून तिची रवानगी हिंडलगा येथील मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली आहे.

सोमवारी तिला पुन्हा न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे. शुक्रवारी मध्यरात्रीनंतर झालेल्या भांडणानंतर अशांनी ओढणीने गळा आवळून अमितचा खून केल्याचे उघडकीस आले होते. अमित हा मूळचा चिकोडी तालुक्यातील कब्बूूरचा राहणारा होता.