- चालकाच्या सतर्कतेमुळे दुर्घटना टळली
गोकाक / वार्ताहर
रस्त्यालगतच्या शेतात सरकारी बस घुसली पण चालकाच्या सतर्कतेमुळे ६० प्रवाशांचा जीव वाचल्याची घटना गोकाक तालुक्यात घडली आहे.
सुमारे ६० प्रवाशांना गोकाक येथून सावळगी गावाकडे घेऊन जात असताना हा अपघात झाला. या अपघातात चालक किरकोळ जखमी झाला असून त्याला उपचारासाठी स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची घटना गोकाक शहर पोलीस स्थानकाच्या हद्दीत घडली आहे.
0 Comments