बेंगळुरू: बेळगाव दक्षिण मतदारसंघाचे आमदार अभय पाटील आणि कर्नाटक विधानसभेतील विरोधी पक्षनेते अरविंद बेल्लद यांनी शुक्रवार दि. १४ फेब्रुवारी रोजी राज्यपाल थावरचंद गेहलोत यांची भेट घेतली. या भेटीत बेळगाव प्रादेशिक आयुक्तांनी दिलेल्या आदेशाबाबत संपूर्ण माहिती आणि कागदपत्रे देऊन त्यांच्याशी चर्चा केली. 

यावर राज्यपालांनी सकरात्मक प्रतिसाद दिला आणि याप्रकरणी कोणती कारवाई करायची आहे ते संबंधितांना निश्चितपणे कळवण्याचे आश्वासन दिले.