खानापूर / प्रतिनिधी 

खानापूरच्या तहसीलदारपदी नियुक्ती झालेले दुंडाप्पा कुमार यांनी गुरूवार दि. २७ फेब्रुवारी रोजी पदभार स्वीकारला. या पदावर असलेले तहसीलदार प्रकाश गायकवाड यांच्यावर लोकायुक्तांचा छापा पडल्यानंतर त्यांना निलंबित करण्यात आले होते. या कारवाईवर त्यांनी न्यायालायात धाव घेऊन स्थगिती आणली होती.  

मात्र महसूल खात्याच्या वतीने सोमवारी राज्यातील १९ तहसीलदारांच्या बदली आदेशात ढुंडाप्पा कुमार यांची खानापूरच्या तहसीलदारपदी बदली करण्यात आली होती. या आदेशानुसार आज त्यांनी पदाची सूत्रे स्वीकारली. यापूर्वी त्यांनी यादगीर जिल्हाधिकारी कार्यालयात ग्रेड टू तहसीलदारपदी आणि अथणी तहसीलदार कार्यालयातही काम केले आहे.