पुणे दि. १० : महाराष्ट्र राज्यात उद्या दि. ११ फेब्रुवारीपासून इयत्ता बारावी ची परीक्षा सुरू होत आहे. तर दि. २१ फेब्रुवारीपासून इयत्ता १० च्या परीक्षेला प्रारंभ होणार आहे. या पार्श्वभूमीवर खानापूर (बेळगाव) मित्र मंडळ, पुणे व ज्ञानवर्धिनी प्रतिष्ठान खानापूर (बेळगाव) यांच्यावतीने पुणेस्थित खानापूर व बेळगाव करांच्या इयत्ता बारावी व दहावीतील विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना, दडपण न घेता धैर्याने परीक्षेला सामोरे जा असे सांगून विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढवला.
यावेळी खानापूर (बेळगाव) मित्र मंडळ पुणेचे अध्यक्ष विजय पाटील, मंडळाचे व प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष पीटर डिसोझा, जेष्ठ संचालक लक्ष्मण काकतकर, रामचंद्र निलजकर, मंडळाचे सचिव व प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष शिवाजी जळगेकर, खजिनदार नारायण गावडे, सदस्य शिवानंद चन्नेवाडकर, संजय सुतार, महिला सदस्य शीतल तवर, रूपाली गुरव तसेच इयत्ता दहावी आणि बारावीचे विद्यार्थी व पालकवर्ग उपस्थित होते.
0 Comments