सौंदत्ती : श्री रेणुका यल्लमा देवस्थान सौंदत्ती येथे देवस्थान विकास प्राधिकार आणि देवस्थानाची विकास मंडळाच्यावतीने हाती घेण्यात आलेल्या विविध विकास कामांसह येत्या 12 फेब्रुवारी 2025 रोजी श्री रेणुका यल्लम्मा देवस्थानामध्ये माघी पौर्णिमेनिमित्त होणाऱ्या यात्रेच्या पूर्वतयारी संदर्भात आज सोमवारी बेळगावचे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन आणि जिल्हा पोलीस अधीक्षक भीमाशंकर गुळेद यांनी सौंदत्ती यल्लमा देवस्थानाच्या आसपासच्या विविध प्रदेशांना भेटी देऊन पाहणी केली. याप्रसंगी देवस्थान विकास प्राधिकारचे सचिव अशोक दुडगुंटी, देवस्थान विकास समितीचे मंडळाच्या आयुक्त गीता कौलगी, सौंदत्तीचे तहसीलदार आणि संबंधित इतर अधिकारी उपस्थित होते.
0 Comments