विजयपूर / दीपक शिंत्रे 

बाल शिवबाचा पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमी, अर्थात विजयपूरात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती  विविध ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.येथील श्री शिवाजी महाराज चौकात जिल्हा पालकमंत्री डॉ. एम.बी पाटील यांनी शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. याप्रसंगी माजी मंत्री अप्पासाहेब पट्टणशेटटी, जिल्हाधिकारी टी. भुबालन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ॠषी आनंद जिल्हा पोलिस प्रमुख लक्ष्मण निंबरगी यांच्यासह लोकप्रतिनिधी उपस्थित होते. 

त्याचप्रमाणे शहरातील श्री शिवाजी महाराज  सोसायटीच्या वतीने शिवरायांच्या जयंतीनिमित्त  सकाळी भगवा ध्वजारोहण अध्यक्ष शंकर कणसे यांच्या हस्ते करण्यात आले. तर सोसायटीचे उपाध्यक्ष संजय जंबुरे यांनी श्री शिवाजी महाराजांच्या कांस्य पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून पूजन केले. या प्रसंगी सोसायटीच्या संचालक मंडळाचे सदस्य डॉ सदाशिव पवार, बी.टी.तरसे, महादेव पवार, प्रविण बोडके, रामचंद्र चव्हाण, सरोजिनी निक्कम, अंबुताई जाधव, सुरेखा कदम, रवि मदभावी, भरत देवकुळे, पांडुरंग रोहिते, मुख्य व्यवस्थापक संजय जाधव, चंद्रकांत जाधव, अंबादास चव्हाण, विठ्ठल चव्हाण  व इतर उपस्थित होते.

तसेच मराठा समाजाच्या वतीने शिवाजी पेठेतील ईश्वर मंदिरात सांस्कृतिक भवनात माजी मंत्री अप्पासाहेब पट्टणशेटटी यांच्या हस्ते शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. भगतसिंग चौकात महानगरपालिका सदस्य प्रेमानंद बिरादार, राजू मग्गीमठ, यांच्या हस्ते शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पूजन करून अभिवादन करण्यात आले, शिराळ शेट्टी चौकातील महाराजांच्या पुतळ्यास महानगरपालिका सदस्य अशोक न्यामगौंड यांच्याहस्ते पूजन करून अभिवादन करण्यात आले. या प्रसंगी महापालिका सदस्य एम.एस.करडी, भाजपाचे युवा नेते श्रीहर्षगौडा पाटील व इतर मान्यवर उपस्थित होते.

शहरातील शिवाजी चौकात उभारण्यात आलेल्या भव्य अशा व्यासपीठावर महिला भगिनींनी शिवबाचा जयंतीनिमित्त पाळणा गीत गायन केले. याप्रसंगी मराठा समाजाचे अध्यक्ष विजय चव्हाण, महानगरपालिका सदस्य राहुल जाधव, प्रभाकर भोसले, तानाजी जाधव, विजयकुमार घाटगे, शिवाजी कणसे, सचिन गायकवाड, संतोष पवार, यांच्या सह मोठ्या संख्येने महिला भगिनी, शिवप्रेमी उपस्थित होते.