सांबरा / वार्ताहर
सांबरा येथे चोरट्यांनी स्टेट बँक ऑफ इंडियाचे एटीएम फोडून मोठी रक्कम लांबविली असल्याची घटना उघडकीस आली आहे. यामध्ये एकूण किती रक्कम चोरीस गेली याबाबतची चौकशी सुरू करण्यात आली आहे.
विशेष म्हणजे आणखी काही ठिकाणी एटीएम फोडण्याचा प्रयत्न झाला असल्याचे वृत्त आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन चौकशीस प्रारंभ केला आहे. या एटीएम वर असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर काळया रंगाचा स्प्रे मारून सीसीटीव्ही निष्क्रिय बनविण्यात आले आहेत. त्यानंतर हा लुटीचा प्रकार करण्यात आला असल्याचे समोर येत आहे.
0 Comments