बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण युवा समितीची व्यापक बैठक  उद्या शनिवार दि. १५ फेब्रुवारी २०२५ रोजी सायंकाळी ५.०० वाजता युवा समिती कार्यालय कावळे संकुल टिळकवाडी बेळगाव येथे आयोजित करण्यात आली आहे. सदर बैठकीत मराठी भाषा गौरव दिन, सामान्यज्ञान स्पर्धा बक्षीस वितरण, आदर्श शाळा पुरस्कार कार्यक्रमाचे नियोजन आणि इतर विषयावर निर्णय घेण्यात येणार आहेत. तरी सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मराठी भाषिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन अध्यक्ष अंकुश केसरकर यांनी केले आहे.