बेळगाव : कोरे गल्ली शहापूर येथील रहिवासी व बेळगावच्या मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटरचा क्रीडापटू योगेश भाऊराव पाटील याने भारतीय सेनादलाच्या संघासमवेत ब्रह्मपुत्रा नदीमधील १०४३ कि.मी. इतक्या दीर्घ अंतराच्या अत्यंत धाडसी रिव्हर राफ्टींगचा विक्रम प्रस्थापित केला आहे.
नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ माउंटनरिंग अँड ॲडव्हेंचर स्पोर्ट्स नासमास यांच्यावतीने अलीकडेच ब्रह्मपुत्रा नदीमध्ये लांब पल्ल्याची रिव्हर राफ्टिंग मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेमध्ये बेळगावच्या योगेश पाटील याचा सहभाग असलेल्या भारतीय सेनादलाच्या संघाने भाग घेतला होता. ब्रह्मपुत्रेमध्ये गेल्या १४ जानेवारीपासून १० फेब्रुवारी २०२५ पर्यंत ही मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेअंतर्गत इतिहासात पहिल्यांदाच गेलिंग इंडो चायना बॉर्डर ते फिनेश -हॅटसिंगमारी -इंडो बांगलादेश बॉर्डर हा १०४३ कि.मी. इतक्या दीर्घ अंतराचा रोमांचकारक धाडसी प्रवास यशस्वीरित्या पार पाडण्यात आला. सदर मोहीम यशस्वी करणाऱ्या भारतीय सेनादलाच्या १२ जणांच्या संघामध्ये सेनादलातील आठ आणि चार सामान्य नागरिकांचा समावेश होता. सदर यशाबद्दल योगेश भाऊराव पाटील याच्यासह भारतीय सेनादलाच्या संघावर अभिनंदनचा वर्षाव होत आहे.
0 Comments