कार्यक्रमाचे दिपप्रजलन करताना विकास कलघटगी,
विश्वभारत सेवा समिती संस्थेचे सचिव प्रकाश नंदिहळी,
एन. एफ. कटांबळे, गोपाळ गावडा,भारती वाढवी,
प्राचार्या ममता पवार व इतर

बेळगाव : जगात करिअर करण्यासाठी अनेक क्षेत्रे आहेत मात्र आम्ही मोजक्याच क्षेत्रात गुरफुटलो आहोत करियर निवडताना आत्मविश्वासाने सामोरे जावे ज्ञानाबरोबर व्यक्तिमत्व विकासाचे धडे कॉलेजमधूनच मिळायला हवेत असे ज्येष्ठ पत्रकार गोपाळ गावडा यांनी व्यक्त केले.. विश्वभारत सेवा समितीच्या पंडित नेहरू पीयू कॉलेजच्या वार्षिक स्नेहसंमेलनात प्रमुख वक्ते या नात्याने ते बोलत होते. ते पुढे म्हणाले आज प्रत्येकाजवळ मोबाईल आहे. मात्र मोजक्याच विद्यार्थ्यांकडे डिक्शनरी आहे. तसेच आपल्या मेंदूला विचार करण्याची सवय लावा. कॉलेजमध्येच व्यक्तिमत्व विकास करिअर मार्गदर्शन वर्ग राबवले पाहिजेत विश्वभारत सेवा समितीचे शैक्षणिक क्षेत्रात मोठे योगदान आहे शिक्षणाची गंगा ग्रामीण भागात पोहोचवण्याचे कार्य या संस्थेने केले आहे अध्यक्षस्थानी यांनी कटांबळे होते.

कर्यक्रमाची सुरुवात प्रियांका एच. विद्यार्थिनींच्या नृत्यने झाली. यानंतर विश्व भारत सेवा समिती संस्थेचे सचिव प्रकाश नंदिहळी यांनी प्रास्ताविक केले नंतर पंडित नेहरू पदवी पूर्व कॉलेजच्या प्राचार्या ममता पवार यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला, नंतर वार्षिक अहवाल डॉ. स्मिता मुतगेकर यांनी मांडला यानंतर लायन्स क्लबच्या सदस्या भारती वाढवी यांनी विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या त्याचबरोबर विकास कलघटगी यांनी ही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच कार्यक्रमाचे औचित्य साधून वर्षभरात विविध स्पर्धांत यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र स्मृतिचिन्ह व पदक देऊन गौरविण्यात आले. आदर्श विद्यार्थिनी म्हणून श्रुती पाटील हिचा गौरव करण्यात आला. बक्षीस वितरणाची जबाबदारी धनश्री गाडे यांनी पार पाडली. या कार्यक्रमानंतर सांस्कृतिक कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला. 

या कार्यक्रमासाठी उपस्थित विश्व भारत संस्थेचे सदस्य विजय साखळकर पी. आर. गोरल,  वाय. एन. कुकडोळकर तसेच सुरज हतळगे, रेणुका चलवेटकर तसेच इतर शिक्षक वृंद आणि शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी पालक उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. मयूर नागेनहट्टी यांनी केले. व्ही. व्ही. डिचोळकर यांनी आभार मानले.