- वृद्धापकाळ पेन्शनमध्ये गैरव्यवहार होत असल्याच्या तक्रारीनुसार कारवाई
गोकाक / वार्ताहर
शासनामार्फत गरीब व गरजूंना दिल्या जाणाऱ्या वृद्धापकाळ पेन्शनमध्ये गैरव्यवहार होत असल्याच्या आरोपावरून लोकायुक्तांनी आज गुरुवारी गोकाक तहसीलदार कार्यालयावर धाड घातली.
गोकाक तहसीलदार कार्यालयाने अपात्र व्यक्तीला पेन्शन दिल्याची तक्रार एका स्थानिक व्यक्तीने लोकायुक्त कार्यालयाकडे केली होती. या तक्रारीच्या पार्श्वभूमीवर लोकायुक्त एसपी हनुमंतराय यांच्या नेतृत्वाखाली चार अधिकारी आणि सुमारे ३० कर्मचाऱ्यांसह पाच पथकांनी गोकाक येथील तहसीलदार कार्यालयासह चार अधिकाऱ्यांच्या घरावर छापा घालून प्रकरणाशी संबंधित कागदपत्रांची तपासणी केली.
0 Comments