खानापूर / प्रतिनिधी 

देसुर क्रॉसजवळ खानापूर - बेळगाव मार्गावरील एम.जी.मोटर्स या बस निर्मिती करणाऱ्या कंपनीत आज दुपारी भीषण आग लागली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

प्राप्त माहितीनुसार ही आग येथील स्टोअरला लागली असून मोठे आर्थिक नुकसान झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. घटनास्थळी अग्निशामक दलाच्या गाड्या पोहोचल्या आहेत. सध्या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशामक दलाचे प्रयत्न सुरु आहेत.