टेक्नॉलॉजी : भारताने दि. १६ जानेवारी २०२५ रोजी स्पाडेक्स ०१ आणि स्पाडेक्स ०२ उपग्रहांचे यशस्वी पणे डॉकिंग (भ्रमणकक्षेत अवकाशयाने जोडणे) करून इतिहास रचला. या यशामुळे अमेरिका, चीन, रशिया आणि ईएसएसह अंतराळात डॉकिंगचे प्रात्यक्षिक दाखवणाऱ्या देशांच्या उच्चभ्रू गटात भारताचा समावेश झाला आहे. डॉकिंग आश्चर्यकारकपणे अचूक होते, उपग्रह अंतिम टप्प्यात केवळ ८ मिमी / सेकंद वेगाने फिरत होते. 

हा माईल स्टोन भविष्यातील अंतराळ मोहिमांसाठी असंख्य शक्यता उघडतो, ज्यात पॉवर ट्रान्समिशन डेमो आणि दोन उपग्रहांसाठी स्वतंत्र मिशन ऑपरेशन्स चा समावेश आहे. त्यानंतर इस्रोने भारतीय अंतरिक्ष स्टेशन आणि चांद्रयान 4 मोहिमेसाठी कंबर कसली आहे.

लेखक - धीरज जाधव