बेळगाव / प्रतिनिधी 

बेळगावात दलित संघर्ष समिती आंबेडकरवादतर्फे रविवार (दि. १२) जानेवारी रोजी शहरातील आंबेडकर उद्यानात "राजमाता जिजाऊ" जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

यावेळी दलित संघर्ष समिती आंबेडकरवादचे राज्य समन्वयक सिद्धाप्पा कांबळे यांनी राजमाता जिजाऊ यांची प्रतिमा व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. यानंतर जिल्हा समितीच्या बैठकीत गृहमंत्री अमित शहा यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा संसदेत अपमान केल्याने २३ जानेवारी रोजी चलो बेंगळुरू आणि गुरुवारी सकाळी १०.३० वा. बेंगळुरू येथील फ्रीडम पार्क येथे भव्य आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला. या आंदोलनातून गृहमंत्री अमित शहा यांनी गृहमंत्रिपदाचा राजीनामा देऊन डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर नतमस्तक होऊन माफी मागावी. तसेच संविधानाशी असहमत असलेल्यांना भारत सोडण्यास भाग पाडले जाईल, असा इशारा देण्यात आला. 

दलित संघर्ष समिती आंबेडकरवादचे राज्य संघटक सिद्धाप्पा कांबळे यांच्या नेतृत्वाखाली बेळगाव जिल्ह्यातील हजारो दलित बांधव बेंगळुरूला जाणार आहेत.

यावेळी जिल्हाध्यक्ष महांतेश तलवार, मनोहर राजनकट्टी, नागेश कामशेट्टी, सागर कोलकार, आर.जी.कांबळे, रामा चव्हाण, संतोष कांबळे, अशोक कांबळे, सुरेश शिंगे,दीपक सोनटक्की, बैरू मेत्री, दिपाका धबडे, कल्लाप्पा नाईक, बी.एल. भंडारकर, शेखर भंडारकर, सिद्धू कुरंगी, फकीर कुरंगी, पिराजी कुरी, जीवन कुरणे, धनाजी कांबळे उपस्थित होते.